दोघा सराईतांना अटक,४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना महाळुंग एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने अटक केली. एकूण १८ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून ४५ लाख ३३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये एक किलो ७ तोळे दोन ग्रॅम वजनाचे सोने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापस्लेल्या दुचाकी जप्त केल्या.

आमीर शब्बीर शेख (वय २५, रा. सेक्टर २५, निगडी प्राधिकरण, मूळ रा. वडेश्वर काटे, वडगाव मावळ) व सोहेल शफीक पठाण (वय २३, रा. खंडोबा मंदिर पायथा, निमगाव, ता. खेड, ) अशी या दोघांची नावे आहेत.

मोई, कुरूळी, चिंबळी फाटा येथील सीसोटीव्ही फुटेज पाहत असताना दुचाकीवरील एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर एकूण १८ गुन्ह्यांची उकल झाली.