पवनाथडी जत्रेतील ७५० महिला बचत गटांना स्टॉल्सची संधी

PavanaThadi Fair 2025: Exhibition of Women Self-Help Groups' Products and Various Activities पवना थडी जत्रा: महिला बचत गटांचे उत्पादने आणि विविध उपक्रमांचे प्रदर्शन
सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर महिलांच्या उत्पादनांसाठी महापालिकेचा सहकार्याने खुले व्यासपीठ
सांगवी, महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत महापालिकेने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान पवनाथडी जत्रेचे आयोजन केले आहे. या जत्रेतील स्टॉल्सची सोडत सहायक आयुक्त तानाजी नरळे यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आली, ज्यामध्ये ७५० महिला बचत गटांना स्टॉल्स मिळाल्या. यामध्ये दिव्यांग आणि तृतीयपंथीयांसाठी देखील स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले आहेत.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात पवनाथडी जत्रेतील स्टॉल्सची सोडत सहायक आयुक्त तानाजी नरळे यांच्या उपस्थितीत काढली. यावेळी आयुक्त तानाजी नरळे, प्रशासन अधिकारी पूजा दुधनाळे, समाज विकास विभागाचे अनिता बाविस्कर, संतोषी चोरघे, कल्पना मदगे, रेश्मा पाटील, वैशाली खरात, विशाल शेंडगे, संगीता रुद्राक्षे, प्रज्ञा कांबळे, अनिकेत सातपुते यांच्यासह विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होते.
पवनाथडी जत्रेचा उद्देश महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करणे, विपणन कौशल्य शिकवणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. महिलांना एक खुले व्यासपीठ मिळून त्यांच्या दजेंदार उत्पादनांना प्रसिद्धी मिळत आहे.