PCMC पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरात 10-15 वाहनांची तोडफोड करणाऱ्या तीन आरोपींना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तिघांनी सिमेंटचे ब्लॉक आणि दगड मारून वाहनांची तोडफोड केली. घटनेनंतर तासाभरात त्यांना अटक करण्यात आली.
चिंचवड शहरातील उच्चभ्रू क्षेत्र समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरात मद्यधुंद अवस्थेत तिन्ही आरोपींनी वाहनांची तोडफोड केली. सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी कारवाई करत तासाभरात तीन आरोपींना अटक केली. पेट्रोलपंप ते गोविंद गार्डन परिसरात दगड आणि सिमेंटचे ब्लॉक टाकून वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेने पिंपळे सौदागर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगवी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केल्यानंतर घटनास्थळी नेऊन वाहनांची तोडफोड केली व नागरिकांच्या उपस्थितीत त्यांची परेड केली.