पीसीएमसी अंतर्गत दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना

पीसीएमसी अंतर्गत दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना

Disability person vector flat illustration. Young disabled people and friends help them, special needs children with friends, handicapped children isolated on white background, kids with prosthesis.

पीसीएमसी अंतर्गत दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

पीसीएमसी अंतर्गत दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना
पीसीएमसी अंतर्गत दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना

महानगरपालिके(पीसीएमसी)च्या समाज विकास विभागामार्फत या योजना राबविण्यात येत आहेत.

त्या अंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेतून 1 ते 18 वर्षापर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दरमहा 2 हजार रुपयांपर्यंत वार्षिक 24 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहेत. तसेच दिव्यांगामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुला मुलींना दरमहा 3हजार रुपये अर्थसाह्य दिले जाणार आहे. या योजनेचा शहरातील नागरिकांनी लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिके(PCMC)तर्फे करण्यात येत आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य व प्रशिक्षण दिले जाणार आहे. वैद्यकीय शाखेच्या प्रथम वर्षासाठी एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस, बीयुएमएस, बीआर्किटेक्ट, बीपीटीएच, बीएएससी आणि अभियांत्रिकी पदवी शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी एकदाच जास्तीत जास्त एक लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाईल.

तसेच शहरातील दिव्यांगांना महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत आयटीआय एमकेसीएल अंतर्गत एमएससीआयटी, डीटीपी, टॅली व केएलआयसी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या
https://www.pcmcindia.gov.in/marathi/samajvikas.php
संकेतस्थळावर गेल्यावर दिव्यांग कल्याणकारी योजना या सेक्शन वर क्लिक करा.

पात्र उमेदवार खालील योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पीसीएमसी दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना

  • दिव्यांग विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरचे ( प्रथम वर्ष ) वैद्यकीय ( M.B.B.S., B.A.M.S., B.H.M.S., B.D.S., B.U.M.S,) B.Arch, BPTH, B.PHARM, BVSC आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा यांसारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कुष्ठपिडीत व्यक्तींना अर्थसहाय्य
  • पंडित दिनदयाल उपाध्याय – दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (इयत्त्ता १ ली ते वय वर्षे १८ पर्यत)
  • दिव्यांग व्यक्तिंना उपयुक्त साधन घेणे कामी अर्थसहाय्य
  • पंडित दीनदयाल उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी ( अर्थसहाय्य ) योजना
  • दिव्यांग व्यक्तींना बस प्रवास पाससाठीचा अर्ज
  • पंडित दिनदयाल उपाध्याय – ०५ ते १८ वर्षे वयोगटातील दिव्यांगामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग मुला / मुलींना दरमहा अर्थसहाय्य देणे
  • संत गाडगे महाराज – दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाह केल्यानंतर प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देणे

तसेच दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था, वृद्धाश्रम, अनाथालयांना जास्तीत जास्त दोन लाख 99 हजार रुपये मदत करण्यात येईल.

मतिमंदांना सांभाळणाऱ्या महापालिकेतेकडील नोंदणीकृत संस्था आणि बालकास दरमहा 30 हजार रुपये मदत करण्यात येईल.

You may have missed