माजी मंत्री अनिल देशमुख यांनी बीसीसीआयला पत्र लिहून, नागपुरात एकही क्रिकेट सामना न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

आयसीसीने २०२३चा एकदिवसीय विश्वचषक कधी आणि कुठे होणार हे जाहीर केले. 5 ऑक्‍टोबर ते 19 नोव्‍हेंबर या कालावधीत होणार असून यात 10 संघांचे 48 सामने होणार आहेत. आयसीसी विश्वचषक 2023 चे सामने भारतातील 12 वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत. ही शहरे चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, तिरुवनंतपुरम, मुंबई, अहमदाबाद, पुणे, लखनौ, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता आणि धर्मशाला आहेत.

मानाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांमधून नागपूरला वगळल्याने नागपूर-विदर्भातील क्रिकेट रसिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (Board of Control for Cricket in India) अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांना थेट पत्र लिहून भावना कळवल्या.

अनिल देशमुख यांच्या मागणीला राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी उत्तर देत विनम्र ट्विटमध्ये म्हणाले, विदर्भाला पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे, परंतु खेळात कोणताही भेदभाव होणार नाही यावर भर दिला जात आहे. विदर्भात सामने होणार नाहीत हे निराशाजनक असले तरी, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, #ICC निकषांनुसार, सामने फक्त 6 किंवा 8 ठिकाणी खेळवले जावेत. तथापि, बीसीसीआयच्या समर्पित प्रयत्नांमुळे, आता भारतभरात 10 ठिकाणी सामने खेळवले जातील, सराव सामने 2 ठिकाणी होतील.