मग संघर्षाला घाबरतंय कोण? – रोहित पवार
काल महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवत अजित पवार यांनी शिवसेना भाजपा महायुतीत प्रवेश करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
काल रात्री राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत नव्या सरकारला आपला पाठिंबा नसल्याचं स्पष्ठ केलं. त्यावेळी राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार त्याच्याशेजारी उपस्थित होते.
या महाभूकंपावर राजकीय वर्तुळातून सुमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत २ ट्विट केले.
रोहित पवार यांचे पहिले ट्विट
काल च्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राष्ट्रवादीतील आश्वासक चेहरा कोण असा प्रश्न विचारताच शरद पवार यांनी हात वर करत म्हणाले शरद पवार. त्यावर उपस्थितांनी जल्लोषात टाळ्या वाजवत त्यांच्या प्रतिक्रियेच स्वागत केलं. ती विडिओ share करत रोहित पवार यांनी खालील प्रतिक्रिया व्यक्त केली.
#शरद_पवार
बस नाम ही काफी हैं…
रोहित पवार यांचे दुसरे ट्विट
रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या आयुष्यातील विविध घटनांची “गडी एकटा निघाला” या गाण्याबरोबर चित्रफीत पोस्ट करत कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली.
वाट आहे संघर्षाची…
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा…
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच…