मी साहेबांसोबत म्हणत अमोल कोल्हे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला

मी साहेबांसोबत म्हणत अमोल कोल्हे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला

मी साहेबांसोबत म्हणत अमोल कोल्हे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला

मी साहेबांसोबत म्हणत अमोल कोल्हे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला

मुंबई : मी साहेबांसोबत म्हणत अमोल कोल्हे यांनी काल अजित पवार यांची साथ सोडत पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले. दरम्यानच्या काळात ट्विट करत ज्याप्रकारे स्वराज्याच्या ध्येयासाठी कोन्होजी जेधे यांनी वतनावर पाणी सोडले त्याप्रमाणेच आपण राजीनामा देणार असल्याचा मानस त्यांनी ट्विटर द्वारे व्यक्त केला होता.

रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात फूट पाडत सेना भाजपा महायुतीशी हातमिळवणी केली. अजित पवारानीं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेलती त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार dr.अमोल कोल्हे हि राजभवनात उपस्थित होते.

काल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. चर्चेनंतर मी साहेबांसोबत म्हणत अमोल कोल्हे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला.

भेटीनंतर काय म्हणाले शरद पवार

अमोल, ही अस्वस्थता फक्त तुझ्याच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक युवक व मतदाराच्या मनात आहे. आता आपल्याला लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. शिरूरच्या मायबाप जनतेने 5 वर्षांसाठी दिलेल्या जबाबदारीचे 8-10 महिने अजून बाकी आहेत. या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लागली असून अनेक महत्वकांक्षी प्रकल्प दृष्टीक्षेपात आहेत. हे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे सुद्धा तुझं कर्तव्य आहे.

मी मावळा शिवराजयांचा मी मावळा भगव्याचा म्हणत अमोल कोल्हे यांनी ट्विटर वर प्रोफाइल picture पोस्ट केले

मी मावळा शिवराजयांचा मी मावळा भगव्याचा अशा आशयाची प्रोफाईल picture पोस्ट करत पुन्हा नव्या जोमाने जनतेचे काम चालू ठेवण्याचा मानस अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

You may have missed