Don’t be afraid of Corona, take precautions: Municipal Commissioner’s appeal कोरोनाला घाबरू नका, खबरदारी घ्या : महापालिका आयुक्तांचे आवाहन
Don’t be afraid of Corona, take precautions: Municipal Commissioner’s appeal पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधित18 सक्रिय रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये सामान्य लक्षणे आहेत आणि त्यांना घाबरण्याची गरज नाही. मात्र, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेच्या रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह सर्व तयारी करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या कोरोना रुग्णामध्ये अशीच लक्षणे दिसत आहेत. चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे सांगून आयुक्त सिंह म्हणाले, संशयित रुग्णांचे नमुनेही तपासले जात आहेत. सिंह यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
सध्या वातावरणातील सततच्या बदलांमुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आवश्यकतेनुसार सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि जेएन-१ या नवीन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २८) राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून नियमित व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला. यावेळी आयुक्त सिंग, वैद्यकीय व आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.लक्ष्मण गोफणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.