राष्ट्रवादी ला सोबत घेण्यासंदर्भात आम्हाला विश्वासात घेतल नव्हतं – बच्चू कडू
राष्ट्रवादी ला सोबत घेण्यासंदर्भात आम्हाला विश्वासात घेतल नव्हतं, याचं दुःख आहे – बच्चू कडू.
बंडखोरी उठाव परंपरे नं ४०० ४०० वर्षांपासून चालू आहे. आता मीडिया मुळे ते दिसतं. एवढ्या प्रमाणात फुटीला मर्यादा होती पण एव्हडी भयानक फूट झाली. फ़ुटायचं पक्ष घेऊन जायचं आणि पक्षचं ठेवायचा नाही. चिन्हही घेऊन जायचं हे पाहिलं कधी झालं नाही. बंड होतं पण हे मोठ्या प्रमाणात होत आहे.
अजित पवार यांनी जावपास ४० आमदारांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड केलं. या बंदमुळे राजकीय वातावरण चांगलाच ढवळून निघालं आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीत तयार झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर बाकी ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. महायुतीला पाठिंबा देणारे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी याबाबत आपले स्पष्ट मत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सोबत घेतल्याने आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या सर्व आमदारांची गोची झाली आहे.
शरद पवारांनी पक्ष उभारण्यासाठी खूप मेहनत घेतली होती, त्यामुळे या बंडाबद्दल खूप वाईट वाटत आहे. शरद पवार साहेबांना झालेल्या वेदना कमी नाहीत. त्यांचं सांत्वन आम्ही करतो. या उठावाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर शिंदे आणि आता अजित पवार यांनी केली आहे. सगळ्या उठावाचे भिष्म पितामह शरद पवार आहेत. बंड शरद पवारसाठी नवीन नाही. बदलत्या राजकारणात अजित पवार यांनी उचलेल पाऊल अभिनंदनास पात्र आहे, असे बच्चू कडू म्हणाले