शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची दिल्लीमध्ये बैठक घेतली.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या 25 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं त्यामध्ये सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, खासदार फौजिया खान, वंदना चव्हाण, पीसी चाको (केरळ अध्यक्ष), योगानंद शास्त्री, आमदार जितेंद्र आव्हाड, वीरेंद्र वर्मा (हरियाणा अध्यक्ष) यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे महत्वाचे 22 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये अजित पवार यांच्या गटाला धक्का देणारे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीत कोणते महत्त्वाचे ठराव घेण्यात आले ?
तासाभरापेक्षा जास्त चाललेल्या या बैठकीमध्ये लोकशाही मार्गाने राष्ट्रवादीचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात आले. याबरोबरच महत्त्वाचे आठ ठराव संमत करण्यात आले. बैठकीत खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि एस.आर.कोहली यांचं पक्षातून निलंबन करण्यात आल आहे. तसेच महाराष्ट्रातील अजित पवार व त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या आठ आमदारांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
का घेण्यात आली बैठक ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना अजित पवार गटावर कारवाई करा अशा आशियाचे पत्र लिहिलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी पत्राची दखल घेत कारवाई केली आहे.
अजित पवार यांचा बैठकीवर आक्षेप
पण त्यांच्या कारवाईवर अजित पवार यांनी अक्षय नोंदवला आहे.शरद पवार यांनी बोलवलेली बैठक बेकायदा आहे अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे पक्षाबाबत निर्णय फक्त निवडणूक आयुक्त घेऊ शकतो त्यामुळे शरद पवार यांनी घेतलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अवैध व बेकायदेशीर म्हणता येईल असे मत अजित पवार गटाने मांडले आहे.
बैठकीनंतर काय म्हणाले शरद पवार
बुधवारी अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर बोलताना त्यांनी केलेल्या राजकारणाचा आणि घेतलेल्या अनेक निर्णयांची चिरफाड केली होती “शरद पवार यांना नेमका कशाचा हव्यास आहे? वय 82 झालं तरी ते थांबायचं नाव घेत नाहीत. ते निवृत्त का होत नाही?” असा सवाल अजित पवार यांनी केला होता त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले “कोणी 82 म्हणून की 92, मी जोपर्यंत सक्षम आहे, माझं काम जोमाने करत राहणार” असे म्हणत शेवट करताना ते म्हणाले “इथे थांबणे नाहीच”
अजित पवार यांना भाजपाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे, त्याना मुख्यमंत्री व्हायचं आहे, असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्याला उत्तर देताना पवार म्हणाले “कोणाला काय व्हायचे यावर मी काय बोलणार, त्यांना मुख्यमंत्री करा की उपपंतप्रधान करा किंवा पंतप्रधान” या शब्दात तिरकस उत्तर दिलं शरद पवार यांनी उत्तर दिलं.
“पक्ष फोडायचं सध्या फुटलं आहे. शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी पण पक्ष फोडणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागणार हे नक्की.” असा इशारा देतानाच “महाराष्ट्रात 2024 मध्ये जनता पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे सत्ता देतील” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.