Matang community should get Rajya Sabha seat – Amit Gorkhe मातंग समाजाला राज्यसभेची जागा मिळावी – अमित गोरखे
Matang community should get Rajya Sabha seat – Amit Gorkhe महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातींमध्ये हिंदू मातंग समाज लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून या समाजाला जन्माने हिंदू असल्याचा अभिमान आहे. महाराष्ट्रात मातंग समाजाची ताकद जास्त असली तरी कोणत्याही पक्षाने मातंग समाजाला राज्यसभेत किंवा विधानसभेत संधी दिली नाही.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेवर मातंग समाजातील नेत्याला प्रतिनिधीत्व देण्यासाठी विचार करावा, अशी मागणी अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी केली आहे. गोरखे यांनी भाजप हायकमांडला पत्र लिहून मागणी केली आहे की, भाजप हा खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक स्तराला न्याय देणारा पक्ष आहे, त्यामुळे भाजप आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करेल आणि मातंग समाजाला न्याय देईल, असा विश्वास आहे.