येवल्यात शरद पवार यांची घनघाती सभा

येवल्यात शरद पवार यांची घनघाती सभा
येवल्यात शरद पवार यांची घनघाती सभा
येवल्यात शरद पवार यांची घनघाती सभा

राष्ट्रवादीच्या फुटी नंतर आज पहिली सभा शरद पवार यांनी येवल्यात म्हणजे छगन भुजबळ यांच्या मतदार संघात घेतली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार उपस्थित होते.

माझा अंदाज चुकला तुम्हाला त्रास झाला याची मी माफी मागतो

या सभेत त्यांनी भुजबळांवर सडकून टीका केली. माझा अंदाज चुकला तुम्हाला त्रास झाला याची मी माफी मागतो अशा शब्दात त्यांनी येवलेगारांना भावनिक सात घालण्याचा प्रयत्न केला. मगाशी काही वक्त्यांनी सांगितलं की पवार साहेबांनी नाव सांगितलं की आम्ही एकदा दोनदा तीनदा निवडून दिलं. नाव कधी चुकलं नाही. पण एका नावाने घोटाळा झाला. याचा लोकांना वेगळा अनुभव आला त्यासाठी आज मी इथं आलोय. मी कोनावर टीका करण्यासाठी आलो नसून, आज मी इथं माफी मागण्यासाठी आलो आहे, मी यासाठी माफी मागतो की माझा अंदाज कधी चुकत नाही पण इथे माझा अंदाज चुकला. माझ्या विचारावर तुम्ही विश्वास ठेवला त्यामुळे तुम्हाला त्रास झाला. माझ्या निर्णयामुळे यातना झाल्या असतील तर माझं हे कर्तव्य आहे की, तुमच्या सर्वांची माफी मागायला हवी.

कधी पुन्हा तुमच्यासमोर यायची वेळ येईल. आज येईल, उद्या येईल, परवा येईल, महिन्याला येईल, वर्षाने येईल तेव्हा पुन्हा इथं येईल पुन्हा इथं येऊन चूक करणार नाही. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण करायचं ही भूमिका घेऊन राजकारण करण्याचा विचार आम्ही सगळ्यांनी केला. आम्ही सगळ्यांनी एक मोठ्या नेत्याचा मार्गदर्शन घेतलं.

पहिल्या सभेसाठी का केली येवला मतदार संघाची निवड

पवार म्हणाले महाराष्ट्रात या जिल्ह्यांना अनेक वर्षे पुरोगामी विचारांना साथ दिली या नाशिक मधील शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, दुष्काळी भागातील शेतकरी असेल यांच्यावर अनेक संकट आली पण त्यांनी कधी साथ सोडले नाही. त्यामुळे आम्ही विचार केला की मुंबईमध्ये काही लोकांना जनतेच्या समोर सादर केल्यानंतर यश मिळायचं असेल. त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत आणायचा असेल तर भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे, म्हणून आम्ही येवला या मतदारसंघाची निवड केली.

या मतदारसंघाचा इतिहास हा मोठा आहे स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये परकीयांच्या विरुद्ध लढण्यासाठी तात्या टोपे यांनी ऐतिहासिक काम केलं. त्यांची ही भूमी आहे या भूमीतील लोकांवर अडचणी असतील, संकटे असतील, दुष्काळ असेल पण ते स्वाभिमान कधी सोडणार नाहीत या स्वाभिमानी लोकांना पुन्हा शक्ति देण्याची गरज आहे. त्यासाठी आज आम्हा लोकांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल एक काळ असा होता की त्या काळात चुकीच्या काही गोष्टी घडल्या असतील. तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत.

राजकारणात अनेक चढउतार आले राजकारणात अनेक संकटे येतात पण अनेक संकटात लोकांनी माझी साथ सोडले नाही असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांचं नरेंद्र मोदी यांना खुले आवाहन

मध्यंतरी दहा-बारा दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं त्या भाषणात त्यांनी काँग्रेस वरती आरोप केले यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर या आरोप केले शरद पवार यांचा मोदींना आवाहन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो त्यांनी जे आरोप केले ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील त्या रूपांमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोप केले माझे जाहीरपणे पंतप्रधानांना सांगणं आहे आमच्यापैकी कोणी भ्रष्टाचारात सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता वापरा तपास करा. सकल चौकशी करा आणि ज्याने भ्रष्टाचार केलाय असं निष्पन्न झालं तर त्याला पाहिजे ती शिक्षा द्या. त्यासाठी आम्हाला सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा राहील.

वयाबद्दल काय म्हणाले शरद पवार

पवार यांनी शरद पवार यांचं वय झालं आहे आता त्यांनी निवृत्ती घ्यायला हवी असं वक्तव्य केलं होतं. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले माझं वय झालं हे खरं आहे. माझं वय 82 वर्ष झाल आहे. पण गडी काय आहे हे तू पाहिलं कुठं. जास्त काही सांगायची गरज नाही. उगीच वयाच्या वगैरे भानगडीत पडू नका. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल. पुन्हा असा विचार कधी करू नका. निर्णयावर टीका करा कार्यक्रमावर टीका करा पण व्यक्तिगत हल्ला करू नका.

तर तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल…

जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही जनतेचा विश्वासघात करत असाल तर तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल असे म्हणत शरद पवार यांनी भाषणाचा शेवट केला

You may have missed