Shivputra Sambhaji Mahanatya in Bhosari: Dr Amol Kolhe’s election strategy भोसरीत शिवपुत्र संभाजी महानाट्य : डॉ.अमोल कोल्हे यांची निवडणूक रणनीती
Shivputra Sambhaji Mahanatya in Bhosari: Dr Amol Kolhe’s election strategy आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची वेगळी रणनीती पाहायला मिळत आहे. अमोल कोल्हे अभिनीत शिवपुत्र संभाजी हे भव्य नाटक भोसरी विधानसभा मतदारसंघात रंगणार आहे. 22 ते 25 या कालावधीत भोसरी गावच्या जत्रेच्या मैदानावर शिवपुत्र संभाजी या भव्य नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवडमधील 19 आरोपींवर मोक्का, 17 तडीपार, 3 एमपीडीए
तसेच या भव्य नाटकात स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी दिली जात असून सर्वांना मोफत प्रवेश दिला जात आहे. शिवपुत्र संभाजीचा भव्य नाट्यप्रयोग पाहण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. या महानाट्याची सुरुवात शस्त्रपूजनाने करण्यात आली आहे. महानाट्याला सुरुवात होण्यापूर्वी डॉ.अमोल कोल्हे यांनी स्वतः उपस्थितांसमोर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती.आता डॉ.अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघातील अन्य विधानसभा मतदारसंघात असाच प्रयोग करणार का? याबाबत शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
पुणे पोलिसांच्या छाप्यात 4 हजार कोटी रुपयांचे 2 हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त