Two brothers arrested for snatching jewelery from women’s neck महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या दोन भावांना अटक
Two brothers arrested for snatching jewelery from women’s neck मोशी येथे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 300 ग्रॅम वजनाचे आठ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय राजू शेरावत (वय 23 वर्षे), अजय राजू शेरावत (वय 22 वर्षे, दोघे रा. हिंगणगाव, जिल्हा हवेली) अशी चोरीच्या आरोपींची नावे आहेत. अनिल अंकुश नानावत (वय ३९, रा. सणसवाडी, जि. शिरूर) असे चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या दोन भावांना अटक
पोलीस उपायुक्त डॉ.शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता बोऱ्हाडेवाडी मोशी येथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका महिला पादचाऱ्याच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास करत असताना हे दोघेही चोरटे दागिने विकण्यासाठी खादी मशीन रोड येथे येणार असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अक्षय आणि अजयला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक चोरी केल्याचे उघड झाले. अनिल नानावतने त्यांच्याकडून चोरीचे दागिने खरेदी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली.
महाशिवरात्री उत्सवानिमित्त पुणे, पिंपरी चिंचवड ते भीमाशंकर जाण्यासाठी अधिक बस सुविधा
आरोपींकडून 8 तोळे 300 ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी असा एकूण 4 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यातील तीन आणि देहूरोड पोलिस ठाण्यातील एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
ड्रग्ज प्रकरणः बिहारमधून गर्लफ्रेंडला अटक, मुख्य आरोपी धुनिया कुवेतला फरार