Jawaharlal Nehru Urban Revival Mission is being implemented in PCMC पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियान राबवण्यात येत आहे
Jawaharlal Nehru Urban Revival Mission is being implemented in PCMC पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत गोर गरिबांना त्यांच्या मुलभूत सुविधा मिळाव्या यासाठी चिखली येथील प्राधिकरण सेक्टर क्रमांक १७ आणि १९ येथे घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या घरकुल प्रकल्पातील १७८ व्या इमारतीमधील ४२ सदनिकांची संगणकीय सोडत चिंचवड येथील आटो क्लस्टर येथे आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पार पडली.
काय आहे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान ?
जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान हा केंद्र शासनाचा महत्वाचा (फ्लॅगशीप) शहर आधुनिकीकरणाबाबतचा कार्यक्रम आहे. नागरी गरीबांना सेवा पुरविण्याच्या दृष्टीने झोपडपट्ट्यांचा एकात्मिक विकास घडविणाऱ्या प्रकल्पातंर्गत निवारा, मूलभूत सेवा आणि इतर संबंधित नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे हा जवाहरलाल राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियानातंर्गत असणाऱ्या शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा व एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम या दोन घटकांना मुख्य उद्देश आहे.
शहरी गरिबांकरिता मुलभूत सुविधा ही योजना बृहन्मुंबई, मीरा-भायंदर, ठाणे, कल्याण- डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, नांदेड या ९ महानगरपालिका आणि कुळगाव- बदलापूर या नगरपालिका क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे.
या विषयी अधिक माहितीसाठी
● Play Store: https://bit.ly/PCMCApp
● IOS: https://bit.ly/PCMCSmartSarathiIOS