Sarsangchalak Mohan Bhagwat inaugurated the 463rd Sanjivan Samadhi ceremony of Shri Morya Gosavi Maharaj श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 463 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन

0
Sarsangchalak Mohanji Bhagwat inaugurated the 463rd Sanjivan Samadhi ceremony of Shri Morya Gosavi Maharaj श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 463 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन

Sarsangchalak Mohanji Bhagwat inaugurated the 463rd Sanjivan Samadhi ceremony of Shri Morya Gosavi Maharaj श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 463 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्थानिक भाविकांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात धार्मिक विधी, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

‘‘चिंचवड हे स्थान पवित्र व जागृत आहे. येथे मोरया गोसावी महाराजांना साक्षात्कार झाला. मोरया गोसावी महाराजांच्या भूमीत ऊर्जा मिळते’’ असे गौरोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. मोहनजी भागवत यांनी काढले. ‘‘माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो. मंगलमूर्तींचे आशीर्वाद सर्व जगाला लाभोत’’, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. विशेष म्हणजे, ‘‘प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे’’, असे आवाहन सरसंघचालकांनी केले आहे.

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 463 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले.

भोसरी येथे शिलाई केंद्राची उभारणी

४६३ वा श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर २०२४ या कालावधीत चिंचवड, पिंपरी येथे होणार आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्थानिक समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात धार्मिक विधी, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

कार्यक्रमातील ठळक मुद्दे:

१७ डिसेंबर :

  • मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा .
  • अपर्णा कुलकर्णी यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर व्याख्यान.
  • रात्री ८.३० वाजता पंडित संजीव अभ्यंकर यांचे संगीत गायन स्वरसंजीवन.

१८ डिसेंबर :

  • शरदबुवा घाग यांचे कीर्तन.
  • भक्तीपर कार्यक्रम माझिया मोरयाचा धर्म जागो.
  • पंडित जयतीर्थ मेवंडी यांचे भक्ती संगीत गायन.

१९ डिसेंबर :

  • अविनाश धर्माधिकारी यांचे टिळक पर्वावर व्याख्यान .
  • बेला शेंडे यांची संगीत मैफल.

२० डिसेंबर :

  • आरोग्य व रक्तदान शिबीर .
  • पंडित शाहीद परवेझ (सतार), पंडित राजस उपाध्ये (व्हायोलिन) आणि पंडित विजय घाटे (तबला) यांचे सांगीतिक सादरीकरण.

२१ डिसेंबर :

  • पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन.
  • महोत्सवाच्या समारोपप्रसंगी महाप्रसाद.

आला हजरत इमाम अहमद रझा उर्दू प्राथमिक शाळेत जनजागृती सत्राचे आयोजन

जीवनगौरव पुरस्कार :

पंडित गणेश्वरशास्त्री द्रविड यांच्या हस्ते देण्यात येणारा श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना २० डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने साजरा केंला सेवा निवृत्ती दिन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed