The hotel will remain open until dawn हॉटेल पहाटे ५ वाजेपर्यंत राहणार सुरू
हॉटेल व रेस्टॉरंट नाताळ तसेच फर्स्टच्या (दि. ३१) दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट पुणेकरांना उत्साहात साजरा करता येणार आहे. नाताळ व नव वर्षानिमित्त खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम व ऑर्केस्ट्रा बारच्या चालक व मालकांना दि. २५ व ३१ डिसेंबर या दिवशी परवाना प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने नियमित वेळेपेक्षा अधिक वेळेपर्यंत आस्थापना सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकर जल्लोषात नव वर्ष साजर करु शकतात.