Turnover of seven and a half crores in Bhimathadi jatra भीमथडी जत्रेत साडेसात कोटींची उलाढाल

0
Turnover of seven and a half crores in Bhimathadi jatra भीमथडी जत्रेत साडेसात कोटींची उलाढाल

Turnover of seven and a half crores in Bhimathadi jatra भीमथडी जत्रेत साडेसात कोटींची उलाढाल

शिवाजीनगरमधील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर २० ते २५ डिसेंबर दरम्यान भरलेल्या भीमथडी जत्रेला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या वर्षीच्या यात्रेत सात कोटी ६३ लाखांची उलाढाल झाली, तर एक लाखांपेक्षा जास्त ग्राहकांनी भीमथडीला भेट देऊन खरेदी केली आणि विविध पदार्थांवर ताव मारला. पोतराज, नंदीबैल, आदिवासी नृत्य, शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भारुडवाले, मल्लखांब प्रात्यक्षिके आदी कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या १८व्या भीमथडी जत्रेत शेवटच्या दिवशीदेखील प्रचंड गर्दी झाली होती. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भीमथडी जत्रेचा बुधवारी (ता. २५) समारोप झाला. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी भीमथडी जत्रेला भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला.
महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांसह इतर १२ राज्यांतील ३३८ बचत गटांतीलमहिलांनी बनविलेल्या उत्पादनांना ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ग्रामीण उत्पादने, हस्तकला आणि गावाकडील चवीचे पदार्थ या सर्वांना शहरी भागांत बाजारपेठ मिळावी, यासाठी दुवा साधण्याचे काम भीमथडी जत्रा करते. “भीमथडीने सर्वच स्टॉलधारकांना नफा मिळवून दिला असल्याने स्टॉलधारक परतत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि समाधान पाहायला मिळाले,” असे आयोजक सुनंदा पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *