Worker injured due to electric shock विजेच्या धक्क्याने कामगार जखमी

0
Worker injured due to electric shock विजेच्या धक्क्याने कामगार जखमी

Worker injured due to electric shock विजेच्या धक्क्याने कामगार जखमी

चिंचवड, इमारतीवर रंगकाम करत असताना उच्चदाब वीज वाहक तारेचा धक्का बसल्याने रंगकाम करणारा कामगार गंभीररीत्या भाजल्याने जखमी झाला. ही घटना चिंचवड येथील गुरुद्वारा चौकात घडली.

समशेर शब्बीर शेख असे जखमी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी समशेर यांच्या पत्नीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण प्रभाकर चिंचवडे (रा. निसर्ग कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. समशेर हे गुरुद्वारा चौक येथील चिंचवडे यांच्या इमारतीला रंग देण्याचे काम करत होते.

या इमारतीवरून उच्चदाब वीज वाहक तार गेली असतानाही चिंचवडे यांनी समशेर यांना त्याबाबतची पूर्वकल्पना दिली नाही. रंगकाम करताना विद्युत रोधक ग्लोज, बूट दिले नाहीत. तसेच समशेर यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा ठिकाणी काम करण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *