young man robbed through WhatsApp in Moshi व्हॉट्स अॅपवरुण मोशीतील तरुणाची फसवणूक
मोशी : गुंतवणुकीच्या बहाण्याने एकाची २४ लाख ६३ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केली. मोशीतील बोन्हाडेवाडी येथे १७ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत ही घटना घडली. याबाबत ३९ वर्षीय व्यक्तीने रविवारी (दि. २९) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी व्हॉट्स अॅप क्रमांक आणि संबंधित व्हॉट्स अॅप ग्रुप अॅडमिनच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना संबंधित व्हॉट्स अॅप क्रमांकावरून लिंकद्वारे मेसेज आला. त्यांनी लिंकवर क्लिक केले असता त्यांना दोन व्हॉटस् अॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. फिर्यादी यांना गुंतवणूक करण्याबाबत वारंवार मेसेज करून त्यांचा विश्वास संपादन केला. आम्ही सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक केल्यास जादा फायदा होईल, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना २४ लाख ६३ हजार ९९९ रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना नफा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.