fair will be held on 5th and 6th January in Akurdi आकुर्डीत ५, ६ जानेवारीला होणार खंडोबाची जत्रा
आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडेरायाचा उत्सव पाच व सहा जानेवारीला संपन्न होणार आहे. श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ मंडळी, श्री खंडोबा उत्सव समितीच्या यांच्या वतीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल काळभोर व उत्सव समितीचे अध्यक्ष मोहन काळभोर यांनी दिली. उत्सवाची सुरुवात रविवारी सकाळी ‘श्रींना मंगल स्नान व महाभिषेक सोहळ्याने होणार आहे. सायंकाळी सातला ‘श्रीं’ ची महाआरती होणार असून यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री नऊ वाजता ‘श्रीं’ च्या पालखीचा ग्राम प्रदक्षिणा सोहळा होणार आहे. यावर्षी प्रथमच रथामधून पालखी काढण्यात येणार आहे. पिंपळे गुरव येथील ज्ञानेश्वर देवकर यांची बैलजोडी रथास जोडण्यात येणार आहे. उत्सवाच्या दुसन्या दिवशी सकाळी नऊला श्री खंडोबा सांस्कृतिक भवनमध्ये ‘नादच खुळा’ हा सांस्कृतिक व मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाची सांगता वसंतदादा पाटील शाळेच्या मैदानावरील तीन वाजता सुरू होणाऱ्या कुस्त्यांच्या आखाड्याने होणार आहे.