Spontaneous participation of students in painting competition on Durga Devi hill दुर्गादेवी टेकडीवर चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे निगडी येथील दुर्गादेवी टेकडी उद्यान येथे गुरुवारी (दि.२) शालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये पालिकेच्या १४७ शाळांतील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांसह शाळांचे शिक्षक-शिक्षिकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही स्पर्धा इयत्ता पाचवी तेस्पर्धेदरम्यान एका विद्यार्थिनीने काढलेले उत्कृष्ट चित्र. सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन वयोगटांत घेण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी माझा आवडता खेळ, झाडे लावा-झाडे जगवा, आणि भारतीय सण तसेचरक्तदान श्रेष्ठ दान, प्रदूषण- समस्या व उपाय, आणि भारतीय संस्कृतीतील विविधता असे नाविन्यपूर्ण विषय देण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने या उपक्रमाचा लाभ घेत, आपले कलाकौशल्य लावून स्पर्धेत विजयी मिळविला.

स्पर्धेचे आयोजन क्रीडा अधिकारी केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. स्पर्धेचे प्रमुख दीपक कन्हेरे होते. विविध विभागांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या कला शिक्षकांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन हरिभाऊ साबळे आणि सुभाष जावीर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक आणि विभागांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *