strict action will be taken on molester महिला, मुलींची छेडकाढल्यास सोडणार नाही

0
strict action will be taken on molester महिला, मुलींची छेडकाढल्यास सोडणार नाही

strict action will be taken on molester महिला, मुलींची छेडकाढल्यास सोडणार नाही

आकुर्डी, रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणीची दुचाकीवरून आलेल्या तीन मुलांनी छेड काढली. त्यानंतर मुले दुचाकीवरून पळून गेली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कोणताही पुरावा नसताना गल्ली बोळांमध्ये जाऊन चौकशी केली. अखेर एका शाळेत चौकशी करत असताना तिन्ही मुले पोलिसांच्या हाती लागली. महिला व मुलींची छेड काढल्यास कुठूनही शोधून काढू, सोडणार नाही. असा संदेश पोलिसांनी टवाळखोरांना दिला आहे.

एक २३ वर्षीय तरुणी १० डिसेंबर रोजी रात्री ८.२० वाजता म्हाळसाकांत चौक, आकुर्डी येथून पायी जात असताना तीन मुले एका मोपेड दुचाकीवरून आली. पाठीमागे बसलेल्या मुलाने तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तिन्ही दुचाकीवरून गेली. तरुणी घाबरलेली असल्यामुळे सूचना पकडण्याबाबत त्यानुसार आसपासच्या त्यानंतर मुले पळून पोलीस ·कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांनाच शोधून काढलेच ठाण्यात तक्रार देणे टाळले. मात्र चार दिवसांनंतर १४ डिसेंबर रोजी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याची पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. आरोपींबाबत कोणतीही विशेष माहिती नसतानाही पोलिसांनी गल्ली-बोळ शाळा धुंडाळत या मुलांना शोधूनच काढले. १६-१७ वर्ष वयाची मुले असल्याने त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही मुलांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

पालकांवरही गुन्हा दाखल करणार
अल्पवयीन मुलांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. ती दुचाकी एका अल्पवयीन मुलाची आई वापरत असून ती दुचाकी अल्पवयीन मुलाच्या मावशीच्या नावावर आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांना दुचाकी देणार्यांवरही निगडी पोलीस कारवाई करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *