Bike set on fire in parking lot निगडीत पार्किंगमध्ये दुचाकी पेटवली
निगडी, निगडी येथील ओटास्कीम येथे तिघांनी दुचाकी पेटवली. यामध्ये दुचाकी खाक झाली.
ही घटना रविवारी (दि. ५) पहाटे घडली. अरुण मसाजी कांबळे (५२,रा. ओटास्कीम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रेम दत्तात्रय गुडेकर (वय २०), अनिकेत माने (२२), सुरज जोगदंड (२३) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रविवारी पहाटे संशयितांनी दुचाकीला आग लावली.