A case has been registered for breaking the seal of the seized property in Chikhali चिखलीतील जप्त मालमत्तेचे सील तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

चिखली, पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ता कर न भरल्यामुळे जप्त केलेल्या चिखली येथील सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मालमत्तेचे सील बेकायदा तोडल्याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश विठ्ठल जाधव (रा. चिखली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीसीएमसी चिखली कर संकलन कार्यालयाचे सहाय्यक विभागीय अधिकारी बाळू रामचंद्र लोंढे यांनी फिर्याद दिली.

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी विविध मोहिमा राबविल्या जातात. मालमत्ताधारकांना वेळोवेळी नोटीस देऊन कर भरण्यास वारंवार सांगितले जाते. मात्र, त्यानंतरही मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ता जप्त करून सील केली जाते.

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकीत मालमत्ता कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मोठी थकबाकी आहे आणि वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी भरली जात नाही, अशा मालमत्ता जप्त करून सील केल्या जात आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडल्यास संबंधितव्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *