Former Mayor Tatya Kadam passes away माजी महापौर तात्या कदम यांचे निधन

0
Former Mayor Tatya Kadam passes away माजी महापौर तात्या कदम यांचे निधन

Former Mayor Tatya Kadam passes away माजी महापौर तात्या कदम यांचे निधन

पिंपरी, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर कृष्णा उर्फ तात्या शंकरराव कदम(दि.१६) यांचे बुधवारी ७५ व्या वर्षी निधन झाले. ते महापालिकेचे दुसरे महापौर होते. त्यांनी १९८८ ते १९८९ पर्यंत शहराचे नेतृत्व केले. त्यांच्या मागे तीन मुले, जावई आणि नातवंडे आहेत.

 मेडिकल दुकानातील रोख रकमेची चोरी

उपआयुक्त निलेश भदाणे यांनी महापालिकेच्या वतीने त्यांना श्रद्धांजलीअर्पित केली. जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपलेखाधिकारी अनिल कुंहाडे, अभिजीत सांगडे, वसंत शिंदे आणि बाजीराव ओंबळे या प्रसंगी उपस्थित होते.

वाचन संस्कृती रुजविण्यासाठी महापालिका उपक्रम -विजयकुमार खोराट

तात्या कदम कात्रजगावचे माजी सरपंच व्यवसाय निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी भागात त्यांच्या भावासह ८० च्या दशकात स्थायिक झाले आणि बघता बघता कात्रजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. तात्या आशिया खंडातील सर्वात श्रीमंत अश्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे १९८८ – ८९ ला महापौर झाले.तसेच त्यांचे दुसरे बंधू अशोकराव कदम हे स्थायी समितीचे चेअरमन झाले,कालांतराने तात्यांच्या भावजय सौ.मंगलाताई कदम या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहनेत्या झाल्या तो नगरसेवक पदाचा वारसा आजही चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *