राहुल कानाल यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची मालिका अजून चालूच आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स विभागाच्या पथकाने राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला होता, पण त्यांना काहीही सापडले नाही. त्यावेळीही राहुल कानाल यांनी आदित्य ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. मात्र, आदित्य राजकारणात व्यस्त असल्याचा फायदा घेत युवासेनेचे काही पदाधिकारी आपल्याला डावलत असल्याचा आरोप करत कनाल यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.

राहुल कनाल यांची विराट कोहली आणि सलमान खानसारख्या प्रसिद्ध व्यक्तींशी मैत्रीचे संबंध आहेत. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राहुल कनालसह युवासेनेच्या नेत्यांवरही काही लोकांनी आरोप केले आहेत. पण त्यातही पुढे फार काही झालं नाही.

You may have missed