Couple on bike injured after collides with container in Chinchwad चिंचवडमध्ये कंटेनरची धडक, दुचाकीवरील जोडपे जखमी

0

चिंचवड, जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर कटरच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. चिंचवड येथील महावीर चौकात गुरुवारी हा अपघात झाला. अनिल दादासाहेब जाधव (वय ४८) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रभाकर विश्वनाथ भगत (वय ४७, रा. धावडे वस्ती, शिवगणेशनगर, भोसरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिल जाधव व त्यांची पत्नी सविता जाधव हे दुचाकीवरून चिंचवड स्टेशनकडे जात होते. त्यावेळी कंटेनरचालकाने बेदरकारपणे गाडी चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात पती-पत्नी दोघेही जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *