PCMC Design Education Fair from Friday शुक्रवारपासून पीसीएमसी डिझाइन एज्युकेशन फेअर

0

चिंचवड, व्हीनस आर्ट फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ, दिशा सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीएमसी डिझाइन एज्युकेशन फेअर २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्धाटन चिंचवड, ऑटो क्लस्टर येथे शुक्रवारी (दि. २४) सकाळी १ वाजता, तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना व पालकांसह सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.

शुक्रवार (२४ डिसेंबर) ते रविवार (२६ डिसेंबर) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत या कार्यक्रमात विविध कार्यक्रम होणार आहेत. इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत विविध कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार आहेत. डिझाईन क्षेत्रातील भारतातील नामांकित विद्यापीठाचा एक विभाग बारावीनंतर विद्यार्थ्यांना डिझाइन शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन करणार आहे. त्याचे विद्यार्थी आणि पालकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन व्हीनस आर्ट फाऊंडेशन चे ट्रस्टी संतोष निंबाळकर यांच्याकडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *