Pedestrian dies after being hit by unidentified vehicle in Mahlunga महाळुंगेत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू
अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री माहळुंगे येथे हा अपघात झाला. संकेत कुमार साहू (26) असे मृताचे नाव असून तो मध्य प्रदेशातील निघोजे येथील रहिवासी आहे. पोलीस अंमलदार गणेश घाडगे यांनी माहळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.