pimpale saudagar पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलेनियम सोसायटीजवळ रस्ता खचला

pimpale saudagar पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलेनियम सोसायटीजवळ रस्ता खचला
pimpale saudagar पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलेनियम सोसायटीजवळ रस्ता खचला
pimpale saudagar पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलेनियम सोसायटीजवळ रस्ता खचला

pimpale saudagar pcmc पिंपळे सौदागर मध्ये रस्ता खचण्याची घटना घडली आहे. आयकॉन रोडवरील रस्ता या ठिकाणी खचला सुदैवाने त्यावेळी या ठिकाणी कोणतीही रहदारी नव्हती. त्यामुळे कोणतीही जीवन जीवित हानी झाली नाही. कुणाल आयकॉन रोड हा पिंपळे सौदागर मधील उच्चभ्रू सोसायटी मधील रोड आहे. सध्या सुरू असलेल्या सलग तीन ते चार दिवस पडलेल्या सततच्या पावसामुळे हा रस्ता खचलेला आहे. रस्त्याच्या बाजूला एका मोठ्या कन्स्ट्रक्शन साईटचे काम चालू असल्यामुळे. यासाठी खणल्या गेलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे रस्ता खचल्याच कळून येत आहे. सकाळी सहाच्या दरम्यान हा रस्ता खचला त्यावेळी कोणतीही वर्दळ या ठिकाणी नव्हती त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. महानगरपालिका प्रशासन व बिल्डर्स यांच्या मदतीने रस्ता सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवरती काम चालू आहे.

कुणाल आयकॉन रोड, प्लॅनेट मिलेनियम सोसायटीच्या शेजारी, रस्ता खचल्यामुळे रहिवासी आणि अधिकारी यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्याकडून तत्काळ घटनास्थळाला भेट देत, त्यांनी परिस्थितीची तात्काळ दखल घेतली आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही सुरू केली. त्यांनी तत्काळ संबंधित बिल्डरला घटनेची माहिती दिली आणि नुकसानीच्या प्रमाणात मूल्यांकन करण्यासाठी पाहणी केली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने महापालिका इमारत विभाग व पाणीपुरवठा विभागाला रस्ता खचल्याची माहिती दिली. त्यांनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि परिसरातील रहिवासी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

संभाव्य धोके लक्षात घेता, महापालिकेने नागरिकांना आवाहन केले की, जोपर्यंत योग्य सुरक्षा उपायांची अंमलबजावणी होत नाही आणि रस्ता सुरक्षित स्थितीत आणला जात नाही तोपर्यंत बाधित रस्ता वापरणे तात्पुरते टाळावे.

रस्ता खचलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी आणि परिसरातील समुदायाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

You may have missed