Fraud under the pretext of providing ‘MHADA’ flats भोसरीमध्ये ‘म्हाडा’ चे फ्लॅट देण्याच्याबहाण्याने फसवणूक
भोसरी, म्हाडाचे फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी नागरिकांची फसवणूक करण्यात केली. ही घटना सप्टेंबर 2022 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत भोसरी परिसरात घडली. प्रतीक धायजे (रा. भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी येथील एका व्यक्तीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयिताने तक्रारदाराला म्हाडाचे घर मिळवून देतो, असे खोटे सांगितले. अनेकांची २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांची फसवणूक झाली. पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील तपास करीत आहेत.