Ravet Barrage Drowning Claims Life of 15-Year-Old Boy रावेत बंधाऱ्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
रावेत, पवना नदीमध्ये बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २०) दुपारी चार वाजता रावेत बंधाऱ्यात घडली.
रावेत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नज हा निगडी येथील शाळेत दहावीमध्ये शिकत होता. सोमवारी तो दोन मित्रांसोबत पवना नदीच्या रावेत बंधाऱ्याजवळ पोहायला गेला होता. पोहत असताना तो बुडाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत शोध घेतला आणि रात्री त्याचा मृतदेह सापडला. त्याला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलवण्यात आले. रावेत पोलिस तपास करत आहेत.