Abandoned Vehicles at Wakad Police Station to Be Auctioned if Not Claimed Within 15 Days वाकड पोलिस ठाण्यात बेवारस वाहने, मालकांनी १५ दिवसांत ताबा घेतला नाही तर लिलाव

Wakad police station
वाकड पोलिस ठाण्याच्या आवारात काही वाहने बेवारस अवस्थेत पडून आहेत. या वाहनांची कागदपत्रे वाहनमालकांनी सादर केल्यास ती वाहने संबंधित मालकांना परत केली जातील. मात्र, जर वाहन मालक १५ दिवसांच्या आत येऊन कागदपत्रे सादर न केल्यास, पोलिस ठाणे कायदेशीर प्रक्रिया राबवून या वाहनांचा लिलाव करणार आहे. वाहनांच्या क्रमांक व चेसिस क्रमांकाची माहिती पोलिस ठाण्याच्या फलकावर दिली गेली आहे, आणि कागदपत्रांची पडताळणी करून वाहन मूळ मालकाला परत केली जातील.