Cleanliness Workshop Conducted by Pimpri-Chinchwad Municipal Health Department as Part of Swachh Survey 2024 स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छता क्षमता कार्यशाळेचे आयोजन

Cleanliness Workshop Conducted by Pimpri-Chinchwad Municipal Health Department as Part of Swachh Survey 2024 स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छता क्षमता कार्यशाळेचे आयोजन
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत “आरोग्य निरीक्षक व सफाई मित्र यांच्यासाठी स्वच्छता विषयक क्षमता बांधणी कार्यशाळा” आयोजित केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका उप आयुक्त सचिन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सफाई कामगार भगिनींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, सहायक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे, राजू साबळे आणि इतर महापालिका अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेचा उद्देश स्वच्छतेबद्दलची क्षमता वाढविणे आणि कर्मचार्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे होता.