Dubai Entrepreneur Vinod Jadhav Honored with ‘Living Legend’ Award at PICT, Encourages Indian Youth to Seize Global Opportunities दुबईतील उद्योजक विनोद जाधव यांचे पीसीईटीत ‘लिव्हिंग लिजेंड’ पुरस्काराने सन्मान, भारतीय तरुणांना जागतिक संधीचा फायदा घेण्याचे आवाहन

0
Dubai Entrepreneur Vinod Jadhav Honored with 'Living Legend' Award at PICT, Encourages Indian Youth to Seize Global Opportunities दुबईतील उद्योजक विनोद जाधव यांचे पीसीईटीत 'लिव्हिंग लिजेंड' पुरस्काराने सन्मान, भारतीय तरुणांना जागतिक संधीचा फायदा घेण्याचे आवाहन

Dubai Entrepreneur Vinod Jadhav Honored with 'Living Legend' Award at PICT, Encourages Indian Youth to Seize Global Opportunities दुबईतील उद्योजक विनोद जाधव यांचे पीसीईटीत 'लिव्हिंग लिजेंड' पुरस्काराने सन्मान, भारतीय तरुणांना जागतिक संधीचा फायदा घेण्याचे आवाहन

आकुर्डी, दुबई येथील उद्योजक विनोद जाधव यांनी भारतीय तरुण उद्योजकांना जागतिक बाजारपेठेतील विविध उद्योगातील संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. ‘पीसीईटी’च्या वतीने जाधव यांना ‘लिव्हिंग लिजेंड’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमात जाधव हे बोलत होते. हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील शैक्षणिक संकुलात पार पडला. पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते जाधव यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमात पोर्टफोलिओ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. मकरंद जावडेकर देखील उपस्थित होते. ‘ग्लोबल आंत्रप्रेन्योर्स कॉन्क्लेव्ह २०२५’चे निमंत्रक सचिन इटकर यांनी यावेळी जाधव यांच्याशी संवाद साधला.

विनोद जाधव यांनी सांगितले की, “मी इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा करून, १३ वर्षे नोकरी केली आणि नंतर फार्मसी क्षेत्रात सक्षमपणे काम करत आहे, त्यामुळे तुम्हालाही काही अशक्य नाही.” जाधव यांना ग्लोबल फार्मसी मार्केट आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक कायदे यावर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed