Successful Climbing Mission of Bhamburde Navra Peak by Adventurers भांबुर्डे नवरा सुळक्यावर गिर्यारोहकांची मोहिम फत्ते

Successful Climbing Mission of Bhamburde Navra Peak by Adventurers

Successful Climbing Mission of Bhamburde Navra Peak by Adventurers

पिंपरी, पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील भांबुर्डे गावाजवळ असलेल्या २०० फूट उंचीच्या अवघड श्रेणीतील ‘भांबुडे नवरा’ सुळक्यावर १३ गिर्यारोहकांनी यशस्वीपणे आरोहण केले. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.

साह्यकडा अॅडव्हेंचर संस्थेचे अध्यक्ष आणि अनुभवी गिर्यारोहक बाबाजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम सुरक्षित पार पाडली. मोहिमेचे नेतृत्व विलास कुमकर आणि निखिल पोखरकर यांनी केले. तसेच नवोदित लीड क्लाईंबर सागर मांडेकर, श्रीराम पवळे, प्रगती चौधरी, श्रुतिका खांदवे, श्रीकांत नागवडे, स्वप्नील साळुंखे, शेखर हाळुंदे, समाधान वडघुले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाल गिर्यारोहक विराज चौधरी (वय १३ वर्षे) यांनीही सहभागी होऊन या मोहिमेत भाग घेतला.

विलास कुमकर यांनी प्रस्तरारोहणाची सुरूवात केली. गिर्यारोहकांनी अरुंद चिमणीमधून कातळाच्या भेगेच्या आधारावर आरोहण, नव्वद अंशातील प्रस्तर चढ़ण, दुसऱ्या टप्प्यातील ३० फुटांची चढाई, प्रस्तराच्या उभ्या सरळसोट भागावर चढताना काटेरी वनस्पतींचा अडसर, आणि शेवटच्या टप्प्यातील ९० फुटांचा ‘स्क्री’ म्हणजेच माती आणि मोकळे दगड, गोटे मिश्रित प्रस्तर अशा अवघड टप्प्यांवर मात केली.

सुळका पादाक्रांत झाल्यावर सर्व टीमने जल्लोष केला आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषांनी आसमंत दणाणून गेला.

You may have missed