Unorganized Workers’ Labour Honour March Reaches Pimpri-Chinchwad असंघटित कामगारांची श्रमिक सन्मान यात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल
Unorganized Workers' Labour Honour March Reaches Pimpri-Chinchwad असंघटित कामगारांची श्रमिक सन्मान यात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल
‘ईएसआयसी’ योजना लागू करण्यासाठी, अपघाती विमा संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा मिळवण्यासाठी असंघटित कामगारांनी बारा राज्यांमधून श्रमिक सन्मान यात्रा काढली होती. ही यात्रा गुरुवारी (ता. १३) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली.
देशभरातील असंघटित कामगारांच्या ९३ टक्के लोकांच्या मागण्यांसाठी कन्याकुमारी येथून दिल्लीकडे निघालेली ही यात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये पोहोचली. वर्किंग पीपल्स कोलिजन, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, बांधकाम कामगार समिती आणि घरेलू कामगार महासंघासह विविध कामगार संघटनांनी थरमॅक्स चौक येथे या यात्रेचे स्वागत केले.
ही यात्रा महाराष्ट्रातील सांगली, सातारा, पिंपरी-चिंचवड, लोणावळा, नवी मुंबई आणि सुरत मार्गे दिल्लीकडे जात आहे. यात्रा पुढे दुर्गानगर, यमुनानगर मार्गे भक्ती-शक्ती शिल्प येथे पोहोचली. याठिकाणी पुष्पहार अर्पण करुन यात्रा स्वागत करण्यात आली. यावेळी अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात सुभाष लोमटे, राजू भिसे, नितीन पवार, काशिनाथ नखाते, मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, श्वेता दामले, वृषाली पाटणे इत्यादींचा समावेश होता.