Grand Pooja and Mahabhishek on Gajanan Maharaj’s Prakatdin in Shegaon प्राधिकरणात श्री गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त महापूजा आणि महाअभिषेक

Grand Pooja and Mahabhishek on Gajanan Maharaj's Prakatdin in Shegaon प्राधिकरणात श्री गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त महापूजा आणि महाअभिषेक
प्राधिकरणात, श्री गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पहाटेच्या काकड आरतीनंतर सकाळी श्रीची महापूजा व महाअभिषेक करण्यात आले. यानंतर भक्तिगीत आणि भावगीतांचा कार्यक्रम झाला. दुपारी १२ वाजता श्री गजानन महाराज यांची महाआरती झाली आणि भाविकांनी ‘गण गण गणात बोते’ चा गजर केला.
श्रीदर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने भाविक रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने भरून गेला होता. दुपारी अभंगवारी आणि हसवणूक कार्यक्रमही आयोजीत केले गेले. या सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ पिसे आणि कार्यकारिणी सदस्य करत होते.