Fraudsters Deceive Woman by Offering Foreign Jobs, Steal Nearly Rs. 30 Lakhs पिंपरीतील महिलेला विदेशी नोकरीचे आश्वासन देत ३० लाखांची फसवणूक

0

पिंपरी चिंचवड, ४ मार्च २०२५ – विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील एका महिलेची तब्बल २९ लाख ९७ हजार ७६८ रुपये फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २६ नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२५ या कालावधीत नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. आरोपींनी महिलेच्या विश्वासाचा फायदा घेत, विविध कारणांसाठी पैसे घेत नोकरी न दिल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी हर्ष मिश्रा, शिवांश पटारीया आणि अविनाश मिश्रा यांच्याविरोधात संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३४ वर्षीय महिलेने ४ मार्च २०२५ रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

महिलेने आपले प्रोफाइल नोकरी डॉट कॉमवर पब्लिश केल्यावर, आरोपींनी तिला नोकरीची ऑफर दिली. सुरुवातीला ८,५०० रुपये रजिस्ट्रेशन फी म्हणून घेतली. त्यानंतर, महिलेला युकेमध्ये नोकरी मिळाल्याचे सांगून रजिस्ट्रेशन फी, कागदपत्रे व्हेरिफिकेशन, व्हिजा फी, कंपनीचे सिक्युरिटी डिपॉझिट, इत्यादी कारणांसाठी पैसे मागितले. महिलेला विश्वासात घेत, नंतर युकेच्या ऐवजी ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी असल्याचे सांगत आरोपींनी अजून पैसे घेतले.

महिलेच्या विरोधात झालेल्या फसवणुकीमुळे तीला आर्थिकदृष्ट्या जबरदस्त नुकसान झाले आहे . पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या प्रकाराने इंटरनेट आणि ऑनलाईन नोकरीसाठी फसवणुकीची गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर आणली आहे. नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed