Civic Felicitation Ceremony for MLA Shankar Jagtap in Wakad वाकड येथे आमदार शंकर जगताप यांचा नागरी सत्कार सोहळा

Civic Felicitation Ceremony for MLA Shankar Jagtap in Wakad वाकड येथे आमदार शंकर जगताप यांचा नागरी सत्कार सोहळा
वाकड, ११ मार्च- वाकड रेसिडेंट्स डेव्हलपमेंट अँड वेलफेअर असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात चिंचवड विधानसभेचे नवनियुक्त आमदार मा. श्री. शंकरभाऊ जगताप यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात उपस्थित नागरिकांनी आमदारांसोबत संवाद साधला आणि वाकड परिसरातील विविध समस्या आणि अडचणी मांडल्या.
सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे महिला दिनाच्या औचित्याने आयोजित केलेला महिला कृतज्ञता सोहळा. या कार्यक्रमात वाकड परिसरातील महिलांचा गौरव करण्यात आला. महिलांनी आपल्या अनुभवांची नोंद करत अनेक अडचणी मांडल्या, ज्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री. शंकर जगताप यांनी दिले.
कार्यक्रमात पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्या प्रा. भारतीताई राजेंद्र विनोदे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, माजी नगरसेविका आरतीताई चोंधे, भाजप उपाध्यक्ष विशाल आप्पा कलाटे, भाजप उपाध्यक्ष राम वाकडकर, युवा नेते श्री. कलाटे, मंडल अध्यक्ष प्रसाद कसप्टे, रामदास कसप्टे यांच्यासह वाकड परिसरातील विविध रहिवासी उपस्थित होते.
सोहळ्यात विविध रहिवासी सोसायटींतील नागरिकांनी आपली समस्या मांडली आणि यावर सकारात्मक चर्चा केली. आमदार शंकर जगताप यांनी वाकड क्षेत्रातील विकासासाठी पुढील काळात विविध उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.
हा कार्यक्रम वाकडच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे, ज्यामुळे नागरिकांचे आणि महिलांचे मुद्दे सरतेशेवटी लक्षात घेतले जातील आणि त्यांच्या समस्यांचे समाधान लवकरात लवकर होईल.