Street Play Organized to Raise Awareness About Mental Health in Gandhi Nagar, Pimpri गांधी नगर पिंपरीत मानसिक स्वास्थ्यावर प्रबोधनासाठी पथनाट्याचे आयोजन

0
Street Play Organized to Raise Awareness About Mental Health in Gandhi Nagar, Pimpri गांधी नगर पिंपरीत मानसिक स्वास्थ्यावर प्रबोधनासाठी पथनाट्याचे आयोजन

पिंपरी, ता. ४: पिंपरी येथील गांधी नगर परिसरात मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन आणि स्नेह फाउंडेशनच्या वतीने मानसिक स्वास्थ्यावर प्रबोधन करण्यासाठी एक प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश मानसिक आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे, तसेच मानसिक त्रास किंवा नैराश्य अनुभवणाऱ्या व्यक्तींना मदत मागण्याचे महत्त्व समजावणे हा होता.

पथनाट्यात कोणत्याही मानसिक त्रासाचा बाऊ न करता मदत मागण्याची आवश्यकता, तसेच आत्महत्येचे विचार मनात येत असल्यास कशी मदत मिळवता येईल, यावर भर देण्यात आला. संस्थेचे आरोग्य समुपदेशक मुकेश सावकारे आणि ऋषिकेश भंडारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कौटुंबिक कलह कशामुळे होतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत सखोल माहिती दिली.

या पथनाट्यात युक्ती माखिजा, अस्मि पटेल, नेहा फिलिप, परिक्रमा राजपाल, नंदेश हिरेमठ, आणि हेमंत सागर यांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला, ज्यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्नेह फाउंडेशनच्या अर्चना जोगदंड आणि श्वेता कांबळे यांसारख्या सदस्यांनी विशेष मदत केली.

या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मुक्ता मानसिक स्वास्थ्य हेल्पलाईनवर संपर्क साधून आवश्यक मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले. हेल्पलाईन क्रमांक आहे: ७८८७८८९८८२.

मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही ही एक प्राथमिक गरज आहे. मानसिक त्रास जाणवत असल्यास मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed