महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला – राज ठाकरे
मुंबई: अजित पवार यांनी आज मुख्यामंत्री शिंदे आणि उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यामंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार ३६ आमदारांसह भाजप सेना महायुतीत सामील झाले. गेल्या ३ वर्षात महाराष्ट्र अशा अनेक राजकीय भूकंपांना सामोरे जात आहे. सद्य परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडवट शब्दात ताशेरे ओढत ट्विट केलं आहे.
आजच्या राजकीय नाट्याची तुलना सिहांसन सिनेमातील शेवटाच्या प्रसंगाशी केला, ज्यात दिगू टिपणीस (निळू फुले यांनी साकारलेलं अजरामर charchter ) ज्यात तो वेडा होतो.
काय म्हणाले राज ठाकरे
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला.
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?