माजी नगरसेविका शोभाताई अदियाल यांचे निधन
पिंपरी, पिंपरी चिंचवड पालिकेच्या माजी नगरसेविका शोभाताई अदियाल यांचे दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते.
शोभाताई आदियाल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका होत्या. 2007 ते 2012 या काळात त्यांनी पिंपळे गुरव येथील सुदर्शन नगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2017 ची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीने लढवली होती. महिला बाल कल्याण सभापती तसेच झोप़डपट्टी सुधार समिती सदस्या म्हणून त्यांनी काम पाहिले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.