A cement crush dumper overturned on the associated Bhakti-Shakti bridge निगडीत भक्ती-शक्ती पुलावर सिमेंट क्रशचा डंपर उलटला

0
A cement crush dumper overturned on the associated Bhakti-Shakti bridge निगडीत भक्ती-शक्ती पुलावर सिमेंट क्रशचा डंपर उलटला

A cement crush dumper overturned on the associated Bhakti-Shakti bridge निगडीत भक्ती-शक्ती पुलावर सिमेंट क्रशचा डंपर उलटला

पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी येथे भक्त्ती-शक्त्ती उड्डाणपुलावर शनिवारी सकाळी सिमेंट क्रशने भरलेला एक डंपर उलटला. हा अपघात तळेगावहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर झाला. यात डंपर चालक व क्लिनर जखमी झाले.

• अपघातामुळे परिसरात चार तास वाहतूक खोळंबली होती. भक्त्ती-शक्त्ती उडाणपुलावर तळेगावहून पुण्यात येणाऱ्या मार्गिकेवर शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सिमेंट कशने भरलेला भरधाव डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. वाहतूककोंडी
• रस्त्यावर सिमेंट क्रशचा ढिगारा पडला होता. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस, अग्निशमन दल, आरोग्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन क्रेनच्या मदतीने उलटा झालेला डंपर रस्त्यातून बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.
• तोपर्यंत अन्य मार्गावर वाहतूक वळवून वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. रस्त्यातील अपघातग्रस्त डंपर बाजूला हटविल्यानंतर डंपरचे सांडलेले ऑइल सिमेंट कश टाकून साफ करण्यात आले.
• तसेच रस्त्यात सांडलेला सिमेंट क्रशचा ढीग जेसीबीच्या साह्याने बाजूला केला. निगडी पोलिस, अग्निशमन दल, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
• वाहतूक सुरळीत करण्यास तब्बल चार तासांचा कालावधी गेला. निगडी येथील मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मार्ग काढताना चालकांना त्रास झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *