A three-tola gold chain was snatched तीन तोळ्याची सोनसाखळी हिसकावली

मॉर्निंग वॉकदरम्यान चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून नेली. भैरवनगर येथील भवानीमाता मंदिराच्या पायऱ्यांवर गुरुवारी (दि. १६) सकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. भैरवनगर धानोरी येथील ७० वर्षीय महिलेने याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चिखलीत विभक्त राहणाऱ्या पत्नीवर चाकूने वार

त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला मॉर्निंग वॉकसाठी एकटीच घराबाहेर पडली होती. चालून कंटाळलेल्या फिर्यादी भवानीमाता मंदिराच्या पायऱ्यांवर थकून बसल्या असताना तेथे चोर आला आणि पत्ता विचारण्याचे आमिष दाखवून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली.

माजी महापौर तात्या कदम यांचे निधन

You may have missed