abhishek Consecration of Mauli’s Samadhi by Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माऊलींच्या समाधीचा अभिषेक

0
abhishek Consecration of Mauli's Samadhi by Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माऊलींच्या समाधीचा अभिषेक

abhishek Consecration of Mauli's Samadhi by Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माऊलींच्या समाधीचा अभिषेक

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (दि. ४) पहिल्यांदाच तीर्थक्षेत्र आळंदीत दाखल झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी माउलींच्या समाधीला अभिषेक व महापूजा करत माऊलींचे दर्शन घेतले.

आळंदी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत केले. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इंद्रायणी प्रदूषित आहे. इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललंय. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्याठिकाणी जातं ते सगळं एकत्र करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे. त्याचा कार्यक्रम आपण मागेच सुरू केलेला आहे. सगळ्या वेगवेगळ्या गावांना ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना, महाराष्ट्र भविष्यातही पुढे जात राहील.
खरं म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला आहे आणि त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली. माउलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की प्रत्येकाकरिता हा क्षण अतिशय सुखाचा असतो. तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माउलींपासून तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे. या विचाराने आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेलाय आणि भविष्यातही पुढे जात राहील, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषद सभापती राम शिंदे, आमदार अमित गोरखे, शंकर जगताप, प्रमुख विश्वस्त ॲॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजनाथ, डॉ. भावार्थ देखणे, शहराध्यक्ष किरण येळवंडे, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, ह.भ.प. चैतन्य महाराज कबीरबुवा, संजय महाराज घुंडरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *