Accused Arrested with Illegal Firearm in Bhosari, Police Take Action भोसरीत पोलिसांनी अवैध शस्त्रासह आरोपीला केली अटक

0

भोसरी, पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथील सदगुरुनगर मध्ये एका आरोपीला अवैध शस्त्रांसह अटक करण्यात आली. आरोपी अर्जिबाज सैफन शेख (वय २६) याने आपल्या जवळ एक लोखंडी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस बाळगले होते, ज्याचा कोणताही कायदेशीर परवाना त्याच्याकडे नव्हता.

या संदर्भात माहिती अशी आहे की, पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार, १८ फेब्रुवारी २०२५ पासून ते ४ मार्च २०२५ पर्यंत कोणत्याही ज्वलनशील, दाहक, स्फोटक किंवा शारीरिक इजा करणाऱ्या वस्तू बाळगण्यावर मनाई आदेश लागू होते. परंतु, या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी अर्जिबाज शेख यांनी ५१००० रुपये किंमतीची लोखंडी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगले होते.

यावर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी सदर आरोपीविरुद्ध आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस शिपाई सुमित दत्तात्रेय देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed