Actress Sonali Kulkarni Encourages Students to Read Marathi Literature अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संगीतले मराठी साहित्य वाचनाचे महत्त्व

0
Actress Sonali Kulkarni Encourages Students to Read Marathi Literature अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संगीतले मराठी साहित्य वाचनाचे महत्त्व

Actress Sonali Kulkarni Encourages Students to Read Marathi Literature अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संगीतले मराठी साहित्य वाचनाचे महत्त्व

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुवारी (दि. २७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरवदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मराठी साहित्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि विविध भाषांतील साहित्य वाचण्याचे महत्त्व सांगितले. त्यांच्या मते, साहित्याचे वाचन आणि चांगली नाटकं, चित्रपट पाहणं आपल्यातील कलाकार जिवंत ठेवते आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करतं.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या परिसरातून ग्रंथ दिंडी काढून करण्यात आली. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांनीही सहभाग घेतला. दिंडीच्या अग्रभागी ढोल-लेझीम पथक होते. यानंतर ‘क्षणिका’ लघुनाट्य प्रदर्शन, हस्तकला कार्यशाळा, वाचन स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या.

प्रसिद्ध साहित्यिक डॉ. माधवी वैद्य यांच्याशी संवाद
दुपारच्या सत्रात ‘भावगंध’ या कार्यक्रमात स्वर, शब्द, संगीतावर आधारित प्रस्तुती केली गेली. यामध्ये प्रसिद्ध साहित्यिक डॉ. माधवी वैद्य यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांनी साहित्य क्षेत्रातील विविध लेखन प्रकारावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण
कार्यक्रमाच्या शेवटी, मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि रोख बक्षिसं प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

आयोजकांचा मार्गदर्शन
या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed