अजित पवार गटाच्या आमदारांनी घेतली शरद पवार यांची भेट

ajit-pawar-ministers-meets-sharad-pawar राष्ट्रवादी झालेल्या फुटी पहिल्यांदाच आज अजित पवार गटाच्या आमदारांनी घेतली शरद पवार यांची भेट.
वाय बी सेंटर या ठिकाणी भेटीत राष्ट्रवादी एकसंध राहण्यासाठी एकत्रित काम करण्याची विनंती
त्यांनी शरद पवार साहेबांना केली.

maharashtra politics: ajit pawar ministers meets sharad-pawar राष्ट्रवादी झालेल्या फुटी नंतर अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदाच आज एकत्रितपणे शरद पवार यांची भेट घेतली. वाय बी सेंटर या ठिकाणी भेटीत राष्ट्रवादी एकसंध राहण्यासाठी एकत्रित काम करण्याची विनंती त्यांनी शरद पवार साहेबांना केली. त्यांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना सांगितलं. शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नाही. असेही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आता त्यामुळे शरद पवार हे अजित पवार गटाचं म्हणणं ऐकतील किंवा स्वतःचा वेगळा गट कायम ठेवतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले प्रफुल्ल पाटील
राष्ट्रवादी पक्ष एक संबंध एकसंध कसा राहू शकतो, याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसांमध्ये मार्गदर्शन सुद्धा करावं. अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील
अचानक अजित पवार गटाचे मंत्री येऊन भेटले झालेल्या सर्व घटनांच्या बद्दल खंत व्यक्त केली दिलगिरी व्यक्त केली.
आणि पक्ष एकसंध ठेवा म्हणून साहेबांकडे आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
पवार साहेबांनी त्याच्यावरती आज काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेल्या भेटीबद्दल मला काहीही वावगं वाटत नाही. शरद पवार हे त्यांचे वर्षानुवर्षीचे नेते आहेत.
यामुळे पुन्हा काही राजकीय समिकरण बदलू शकतात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मला याची काही कल्पना नाही.
तर आपल्याला पुरोगामी विचार पुढे न्यायचा आहे.
भाजपबरोबर जायचं नाही तर असं मत अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी मांडलं.
पुरोगामी विचार असलेल्या लोकांबरोबर राहण्याची आपली भूमिका असल्याचे पवार म्हणाले. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पवार यांनी आपलं मत मांडलं.
बैठक मुंबईतील एनसीपी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पार पाडली पडली.
काय म्हणाले मेहबूब शेख प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
पुरोगामी विचार पुढे घेऊन जायचं याचा अर्थ आमच्या भूमिकेमध्ये म्हणजे पवार साहेबांच्या भूमिकेमध्ये कोणताही बदल नाही.
पुरोगामी विचाराची भूमिका पुढे घेऊन जाताना युवकांनी आता मोठ्या प्रमाणात ती भूमिका पुढे जाण्यासाठी युवकांनी कष्ट घ्यावे.
आणि लढाई लढावी अशा पद्धतीनं पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं.